परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या नेत्या हिलरी क्लिंटन त्यांच्या ‘घरच्या अंगणात जे साप ठेवतात त्यांनाच ते चावतात’ या वाक्याची आठवण करून दिली, दहशतवादाचा सामना करताना पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायाकडे दुर्लक्ष करण्याच्य़ा त्यांच्य़ा कृतीकडे त्यांनी लक्ष वळवले.
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्र्यांनी ही टिप्पणी केली. ते म्हणाले की, “जगात पाकिस्तानला एक दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. इस्लामाबादने आपली भुमिका स्पष्ट करून चांगला शेजारी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे मत व्यक्त केले. जयशंकर आज संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ‘जागतिक दहशतवादविरोधी दृष्टीकोन : आव्हाने आणि पुढील मार्ग’ या मोहिमेत सहभागी होते. या परिषदेमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित स्वाक्षरी कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांना संबोधित केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









