प्रतिनिधी / चिक्कोडी : शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने जिल्ह्यात आज आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे .
चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात या घटनेने खळबळ माजली आहे. होनप्पा महादेव गावडे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सर्पदंश झाल्याने ताबडतोब त्यांना चिक्कोडी सरकारी इस्पितळात नेण्यात आले. परंतु उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.