कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात या महिन्यात सर्प दंशाने मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत तरी मुलीचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी जीवन संपवले. तर कालच एका २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. खरंतर पावसाळा सुरु झाला की अशा घटना अनेक ठिकाणी घडलेल्याआपण पाहिल्या आणि एेकल्या देखील असतील. कधी-कधी रुग्णाला औषधोपचार करण्यात विलंब झाला की रूग्ण दगावू शकतो. तर कधी साप खूपचं विषारी असला तर रूग्ण दगावतो. यासाठी साप चावल्यानंतर प्राथमिक उपचार काय करावेत याची माहिती घरातील सर्वांनाच असणे गरजेची असते. ज्यामुळे रुग्ण दगावणार नाही. यासाठी आज आपण साप चावल्यावर प्राथमिक गोष्टी काय कराव्यात हे जाणून घेऊया.
अशी काळजी घ्या
१)सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवा.
२) सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला दिलासा द्या.
३)बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भितीने रुग्ण दगावतो.
४) सर्पदंश झालेली व्यक्ती मनाने खचण्याची शक्यता असते. अशावेळी त्याला धीर द्या.
५)दंश झालेल्या ठिकाणाच्या थोडी वरच्या बाजूस एक आवळपट्टी बांधावी. ही पट्टी दर अर्ध्या तासाने केवळ पाच ते दहा सेकंद सोडून पुन्हा तशीच बांधा.
६) ज्याठिकाणी सर्प दंश झाला आहे ती जागा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर त्यावर जंतुनाशक लावावे.
७)सर्पदंश झालेल्या व्यक्तीस लगेच सरकारी रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात न्यावे.
८) सर्प दंश झालेल्या व्यक्तीला चालत किंवा घाईने धावत घेऊन जाऊ नये.
९)डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणतीही अॅलर्जी असल्यास आधी डॉक्टरांना कल्पना द्यावी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









