रत्नागिरी/प्रतिनिधी
पूर्ण वाढीच्या पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना चिपळूण वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.ही कारवाई शुक्रवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ६ च्या दरम्यान घोणसरे (ता. चिपळूण) येथील चिवेली फाटा येथे करण्यात आली.याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
रामपूर नियतक्षेत्रातील घोणसरे येथील चिवेली फाटा येथे काहीजण वन्यप्राण्याची कातडी अवैध तस्करी व विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचला होता. त्याठिकाणी सायंकाळी ६ च्या दरम्यान संशयितरित्या वावरणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेला एकजण बामणोली तर दुसरा म्हसळा आणि तिसरा व्यक्ती हा महाड येथील आहे.