विद्युतशक्तीवर चालवण्याचा परिणाम; पदूषणमुक्त अन् वेगवान प्रवास; आजपासून तेजस एक्स्पेसही विजेवर
खेड प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झालेल्या रोहा ते ठोकूर दरम्यान पवासी गाड्या टप्प्याटप्प्याने डिझेलऐवजी विद्युतशक्तीवर चालवण्यात येत आहेत. आतापर्यंत 14 रेल्वेगाड्यांच्या धुरांच्या रेषा बंद झाल्या असून पवाशांचा पवास पदूषणमुक्त अन् वेगवान होत आहे. 25 नोव्हेंबरपासून तेजस एक्स्पेसह अन्य 2 साप्ताहिक एक्स्पेसही विजेवर धावणार आहेत.
इंधन बचत, पदूषण टाळण्यासह गाडीला डिझेल लोको जोडण्याच्या कटकटीतून सुटका होण्यासाठी 2015 पासून हाती घेण्यात आलेले रोहा ते ठोकूर दरम्यानचे विद्युतीकरण 5 टप्प्यात पूर्ण झाले आले. मात्र सबस्टेशनची कामे पूर्ण न झाल्याने गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन लांबणीवर पडले होते. रत्नागिरी येथील ट्रŸक्शन सबस्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतरपवासी रेल्वेगाड्या विजेवर चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वपथम 15 सप्टेंबरपासून तुतारी एक्स्पेस व त्या पाठोपाठ नेत्रावती एक्स्पेस, गरीबरथ, मंगला एक्स्पेस, राजधानी एक्स्पेस, मांडवी एक्स्पेस, कोकणकन्या एक्स्पेस, मडगाव-एर्नाकुलम एक्स्पेस, जनशताब्दी एक्स्पेस, कोच्युवेली-इंदोर साप्ताहिक एक्स्पेस, भावनगर-कोच्युवेली एक्स्पेस विजेवर धावू लागल्या.
चारच दिवसांपासून गांधीधाम-तिरूनेलवेली, बुधवारपासून हापा-मडगाव साप्ताहिक एक्स्पेस, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक एक्स्पेसही गुरूवारपासून विद्युतशक्तीवर धावत आहेत. या पाठोपाठ आलिशान तेजस एक्स्पेसही शुकवारपासून विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. यानंतर 26 नोव्हेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्युवेली साप्ताहिक एक्सपेसही विद्युतशक्तीवर चालवण्याचे नियोजन आहे. विद्युतशक्तीवर धावणाऱया रेल्वेगाड्यांमुळे डिझेल खर्चाची बचत होत असून पदूषणमुक्त अन् वेगवान प्रवास शक्य होत आहे.
‘नागपूर-मडगाव’ 3, 4 डिसेंबरला रद्द
मध्यरेल्वेच्या जळगाव यार्डातील पायाभूत सुविधांच्या दुरूस्ती कामामुळे कोकण मार्गावरून धावणारी 01139/01140 नागपूर-मडगाव एक्सपेसची 3 व 4 डिसेंबरची एक फेरी रद्द करण्यात आल्याचे रेल्वे पशासनाने जाहीर केले आहे. 4 डिसेंबरला सुटणारी हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सपेस एका दिवसापुरती बिना, रतलाम, गोध्रा, बडोदा, वसई, पनवेलमार्गे वळवण्यात येणार आहे.