प्रतिनिधी,कोल्हापूर
आकुर्डे (ता. भुदरगड) येथील स्मिता शिवराज पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेतील मराठी विषयाची पीएच.डी. पदवी संपादन केली. ‘दैनिक सत्यवादीतील साहित्याचा व वृत्तपत्रीय लेखनाचा अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. नाईट कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अरुण शिंदे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, विनय पाटील, बाजीराव जठार, आर. जी. पाटील, केशव राऊत, डॉ. विजयाराणी पाटील, सुस्मिता खुटाशे यांचे त्यांना सहकार्य लाभले.
Previous Articleकार्बन न्युट्रल प्रॉडक्टला जागतिक स्तरावर मागणी
Next Article पुण्यातील व्यावसायिकाची दोन कोटींची फसवणूक









