दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग बाजारपेठेतील व्यापारी सुमंत सुधाकर मणेरीकर यांच्या मातोश्री श्रीमती स्मिता सुधाकर मणेरीकर ( ९२ ) यांचे वृद्धापकाळाने आज शनिवारी निधन झाले. दै. तरुण भारत संवाद तसेच पूर्वीपासूनचे अन्य वृत्तपत्रांचे वितरक कै. सुधाकर अनंत मणेरीकर यांच्या त्या पत्नी होत. तर तरुण भारत संवाद चे वितरक सुमंत मणेरीकर यांच्या त्या मातोश्री होत. त्या भाभी ह्या नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.









