बेळगाव : विमल फौंडेशन आयोजित बॉक्स ऑफिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मॅश फोर्स संघाने विराज डॉमिनेटर्स संघाचा 12 धावांनी पराभव करून विमल चषक पटकाविला. या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात विराज डॉमिनेटर्स संघाने आर्कर योद्धा संघाचा 2 धावांनी पराभव केला. विराज डॉमिनेटर्सने प्रथम फलंदाजी करताना 4.1 षटकात सर्वगडी बाद 8 धावा केल्या. त्याला उत्तर देताना आर्कर योद्धाचा डाव 1.5 षटकात 6 धावात आटोपला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात स्मॅश फोर्स संघाने पॉवरप्ले पँथर संघाचा 1 धावान निसटता पराभव केला प्रथम फलंदाजी करताना स्मॅश फोर्सने 2.2 षटकात 3 गडी बाद 14 धावा केल्या.
याला उत्तर देताना पॉवरप्ले पँथर संघाने डाव 3.5 षटकात 13 धावात आटोपला व विराज डॉमिनेटर्स समाधन राहावे लागले.अंतिम सामन्यात स्मॅश फोर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 1 गडी बाद 32 धावा केल्या. त्याला उत्तर देताना विराज डॉमिनेटर्सने 5 षटकात 3 गडी बाद 20 धावाच केल्या. हा अंतिम सामना स्मॅश फोर्स संघाने जिंकून विजेतेपद पटकाविले. या सामन्यानंतर पुरस्कर्ते किरण जाधव, आर्यन जाधव, सुनील भवानी, हेमंत लुगडे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्मॅश फोर्स संघाला चषक, सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज साद मतवाले, उत्कृष्ट खेळाडू अथर्व काकडे, उत्कृष्ट गोलंदाज पार्थ मांजरे यांना चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









