रिअलमी, पोको, मोटोरोलाचा समावेश : 50 मेगापिक्स कॅमेरा सर्वच फोन्सना
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
5 जी सेवा भारतामध्ये सुरू झाली असून ही सेवा देणारे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. येणाऱया काळामध्ये 5 जी सेवेचा बोलबाला पाहायला मिळणार असून 5 जी सेवा देणाऱया फोन्सची मागणी वाढणार आहे. यात भारती एअरटेलने आघाडी घेतली असून 8 शहरांमध्ये सेवेचा प्रारंभ केल्याचे सांगितले जाते.
5 जी सेवेमुळे अनेक गोष्टी सुलभ आणि सोप्या होणार आहेत. या अनुषंगाने 5 जी सेवा देणाऱया 50 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱयासोबत असलेल्या मोबाईल स्मार्टफोन्सबाबत जाणुन घेऊया. येणाऱया काळात असा फोन खरेदीचा बेत आखत असाल तर पाहा कोणते आहेत ते आघाडीवरचे फोन्स ते.
रिअलमी 9 आय

हा 5 जी सेवा देणारा 15 हजार रुपयांखालील स्मार्टफोन पाहायला मिळतो. 6.6 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले यात असून ऑक्टाकोअर मीडिया टेक प्रोसेसरसह उपलब्ध आहे. 50 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा या फोनमध्ये असून प्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. सोबत 5000 एमएएचची बॅटरीही आहे.
रेडमी 11 प्राईम

15 हजार रुपयांखालील आणखी एक 5 जी सेवा देणारा स्मार्टफोन म्हणून याकडे पाहता येईल. 14,999 रुपयाच्या या फोनला मीडिया टेक डायमनसिटी 700 हा प्रोसेसर असून 6.58 इंचाचा फूल एचडी प्लस डिस्प्ले यात आहे. कॉर्निंग गोरिला ग्लासचे संरक्षणही या फोनला मिळते. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनचे वैशिष्टय़.
पोको एम 4

हा 15,199 रुपयांना येणारा फोन मीडिया टेक डायमनसिटी 700 प्रोसेसरसह आहे. यामध्ये डय़ुअल सिम असणार असून 6.58 इंचाचा फूल एचडी प्लस डिस्प्ले यात आहे. 5000 एमएएचची बॅटरी या फोनला असून 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सलचा पंट कॅमेरा यात आहे.
आयक्यूओओ झेड 6 लाईट

13,999 रुपये ही स्मार्टफोनची किंमत असून स्नॅपड्रगन फोर्थ जनरेशन मोबाईल प्लॅटफॉर्मवर हा फोन सादर करण्यात आला आहे. 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5000 एमएएचची बॅटरी यात आहे. मोबाईल वेगाने चार्ज करण्यासाठी 18 व्हॅट फास्ट चार्जिंगची सुविधा यात आहे.
मोटोरोला मोटो जी 51

या स्मार्टफोनची किंमत 14,949 रुपये इतकी आहे. 4 जीबी आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोअरेजसह येणाऱया या फोनला स्नॅपड्रगन 48 प्लस ऑक्टाकोअर 2.2 गीगाहर्टज प्रोसेसर आहे. 5000 एमएएचची बॅटरी यात असून 50 मेगापिक्सलचा कॅमेरा व 13 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा अशी सोय यात असेल.









