वृत्तसंस्था/ मुंबई
ऑगस्ट 2025 मध्ये वर्षाच्या आधारावर भारतातून होणाऱ्या स्मार्ट फोन निर्यातीत 39 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने 1.53 अब्ज डॉलर्सच्या स्मार्ट फोनची निर्यात केली आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन यांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिकेला वाढली निर्यात
एप्रिल-ऑगस्ट 2025 च्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 25 मध्ये अमेरिकेला झालेल्या एकूण 10.56 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या तुलनेत 80 टक्के निर्यात करण्यात आली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेला 148 टक्के अधिक निर्यात केली गेली आहे. ही निर्यात 96.5 कोटी डॉलरची आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये 38.8 कोटी डॉलरची निर्यात केली होती. ऑगस्ट, सप्टेंबर स्मार्टफोन निर्यातीसाठी सर्वात धिमे मानले जातात.
5 महिन्यात 8.43 अब्ज डॉलर्सची निर्यात
आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये अमेरिकेला 8.43 अब्ज डॉलर्सच्या स्मार्ट फोनची निर्यात करण्यात आली. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये समान अवधीत 2.88 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोनची भारताने निर्यात केली होती. सदरचे प्रमाण पाहता यंदा भारताने तीन पट मूल्याच्या स्मार्टफोन्सची निर्यात अमेरिकेला केली.









