ओव्हरहिटींगमुळे कधीही होऊ शकतो स्फोट
जर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे, चावी आणि मेट्रो कार्ड यांसारख्या वस्तू ठेवल्या तर सावध राहा, अन्यथा तुमचा फोन बॉम्बसारखा कधीही फुटण्याचा धोका संभवतो. मोबाईलच्या कव्हरमध्ये बरेच लोक मेट्रो कार्ड, एटीएम कार्ड, पैसे ठेवतात. पण या कृतीमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत बहुतांश जण अनभिज्ञ असतात. मोबाईल फोनच्या कव्हरमध्ये या वस्तू ठेवल्या तर तुम्ही मोठ्या धोक्मयाला आमंत्रण देत आहात हे निश्चित. नुकत्याच आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशा घटनांसाठी वापरकर्त्याने केलेल्या छोट्या-मोठ्या चुकाच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही तर अनेकांचा जीवही धोक्मयात येऊ शकतो.
फोनमध्ये ओव्हरहिटींग अनेक कारणांमुळे होत असले तरी सर्वात मोठे कारण समोर आले आहे ते म्हणजे मोबाईलवर जाड कव्हर असणे. यासोबतच अनेक प्रकारच्या वस्तू कव्हरच्या आत ठेवणे. वास्तविक, जेव्हा फोन गरम होतो तेव्हा त्यातून हवा जाण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे फोन जास्त गरम होतो आणि स्फोट देखील होऊ शकतो. साहजिकच जेव्हा आपला फोन गरम होऊ लागतो, तेव्हा तो ताबडतोब बंद करून थंड होऊ द्यावा. त्यानंतर थोड्या वेळाने फोन सुरू करा आणि वापरा. यानंतरही फोन गरम होत असेल तर फोनच्या सेटिंगमध्ये तपासा की कोणते अॅप किती बॅटरी वापरत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखादे अनावश्यक अॅप आहे, तर ते लगेच फोनवरून अनइन्स्टॉल करा. तसेच फोनच्या कव्हरमध्ये पैसे, एटीएम, मेट्रो कार्ड किंवा चाव्या ठेवल्या असतील तर सदर वस्तू काढून अन्यत्र ठेवा. यामुळे तुमचे बरेच नुकसान टाळता येईल.









