महानगरपालिका व प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले, रस्ते या समस्यांची पाहणी करते. अधिकाऱ्यांना सूचना करून कामाचे आदेश देते. तात्पुरती मलमपट्टी झाली की पुन्हा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने समस्या ‘जैसे थे’ राहतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होऊन खड्डे निर्माण होतात. शहराचा ‘स्मार्ट’ शहर यादीत समावेश झाल्यानंतर या समस्यांमध्ये भर पडली आहे, हे बेळगावकरांचे दुर्दैव होय…

















