‘बोधी ट्री’ च्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत माहिती
बेळगाव : बोधी ट्री शाळेच्या सर्व वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट बोर्ड बसविण्याचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होत आहे. शाळेसाठी तीन वाहने आगामी आठवड्यात खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आर.बी. धामण्णवर यांनी दिली. विनायकनगर येथील प्रबुध्द भारत एज्युकेशन सोसायटीच्या बोधी ट्री शाळेमध्ये मंगळवारी (ता.8) शाळा व्यवस्थापन मंडळाची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष धामण्णवर बोलत होते. शाळा इमारतीवर पहिला मजला, सभागृह, संरक्षक भिंत, शाळेसाठी स्वच्छतागृह यांसह अन्य कामे लवकरच पूर्णत्वास नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बोधी ट्री शाळा इमारतीसाठी आवश्यक साहित्य दिलेल्या प्रथमश्रेणी कंत्राटदार एन. एच. चौगुले यांचा पालकसदस्य अशी नोंद करून सत्कार करण्यात आला. महापालिका प्रशासकीय विभाग उपायुक्त व प्रबुध्द भारत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापन सदस्य उदयकुमार तळवार, जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांचा शाळा व्यवस्थापन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सोसायटीचे उपाध्यक्ष राहुल मेत्री, संचालक एस. बी. खडेद, ए.डी.असोदे, आर. के. निंगनूरे, एस. एल. भीमनायक, जे. एल. करेयागोळ, पी. ए. मेस्त्री, बी. आर. चन्नय्यानवर, बोधी ट्री शाळेच्या मुख्याध्यापिका जन्नीफर डिसोजा बैठकीला उपस्थित होते. सचिव आर. एस. वाक्षटे यांनी आभार मानले.









