मुंबई
बीएसईवरील स्मॉलकॅप निर्देशांकाने बुधवारी 1 टक्का वाढत 31,396 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. रेल्वे, ऑटो आणि हॉस्पिटल क्षेत्रातील समभागांच्या दमदार कामगिरीमुळे निर्देशांक बुधवारी तेजीत होता. याआधी या निर्देशांकाने 18 जानेवारी 2022 रोजी 31,304 अंकांची पातळी गाठली होती. गेल्या महिन्याभरात हा निर्देशांक जवळपास 6.6 टक्के इतका वाढला आहे. याशिवाय या निर्देशांकातील 53 समभागांनी 52 आठवड्याची उच्चांकी गाठली होती.









