पोस्टल सचिव विनीत पांडे यांची माहिती
नवी दिल्ली
: पोस्टल निर्यात केंद्रांमुळे छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि यामुळे देशाची निर्यात वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती पोस्ट विभागाचे सचिव विनीत पांडे यांनी दिली आहे. पोस्ट ऑफिस कमी खर्चाची आणि सुलभ प्रक्रियेसह लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी उपयुक्त अशी योजना आखणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पांडे म्हणाले की, विभाग ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट’ (ओडीओपी), छोटे व्यवसाय आणि ईशान्येकडील राज्यांसाठी आपले नेटवर्क उपयुक्त बनवण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना बनवत आहे. इंडिया पोस्ट-अमृतपेक्स-2023 द्वारे आयोजित कार्यक्रमात त्यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.









