जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : सोमवारी शिक्षेची सुनावणी : न्यायालयाच्या आवारात खोची ग्रामस्थांची गर्दी
प्रतिनिधी/कोल्हापूर
सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी नराधम बंडा उर्फ प्रदीप दिलीप पोवार याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी गुरुवारी दोषी ठरविले. सोमवारी (2 मे) रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. खोची (ता. हातकणंगले) येथे 31 ऑक्टोबर 2021 रोजी ही घटना घडली होती. विशेष सरकारी वकील अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. दरम्यान न्यायालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, खोची (ता. हातकणंगले) येथील एका शेतकरी कुटूंबातील 6 वर्षाची चिमुरडी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिची आई शेतातून काम करुन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. याची माहिती गावातील नागरीकांना समजली, ग्रामस्थांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी सदरची बालिका गावातीलच बंडय़ा पोवार याच्यासोबत सकाळी 11 वाजता पाहिल्याचे चौघांनी सांगितले. यानुसार ग्रामस्थांनी बंडय़ाच्या घरी जावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणास या संदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगून तो झोपी गेला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नितीन जाधव, व वाघ या दोन तरुणांना गावातीम जामा मश्चिदीमध्ये करंजीच्या झाडाखाली संबंधीत चिमुरुडी निपचीत अवस्थेत पडल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वडगांव पोलीस तसेच चिमुरडीच्या नातेवाईकांना दिली. त्या चिमुरडीचे आई – वडील व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्या चिमुरडीच्या तोंडातून व नाकातून रक्त येत होते, तसेच तिच्या शरिरावर जखमा दिसत होत्या. घटनास्थळी तात्काळ वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे व त्यांचे पथक दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविला. यावेळी तेथील डाŸक्टरांनी संबंधीत चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तात्काळ मृतदेह सिपीआर येथे नेवून रात्री 10 ते 11. 30 वाजता इन कŸढमेरा उत्तरीय तपासणी सुरु केली.
दरम्यान वडगांव पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. यावेळी संबंधीत चिमुरडी सकाळी 11 वाजता गावातीलच बंडय़ा उर्फ प्रदीप पोवार याच्यासोबत फिरत असल्याचे समोर आले. यानुसार पोलिसांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता.