ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मालाड परिसरातील जामऋषी नगर या वन जमिनीवरील झोपडपट्टीला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामऋषी नगर या झोपडपट्टीतील एका घरात आज सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर क्षणार्धात आगीने उग्र रुप धारण केले अन् आग झोपडपट्टीत पसरली. एकापाठोपाठ एक अशा 15 झोपडय़ांमधील सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत या आगीत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून, दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
अधिक वाचा : पोटनिवडणुकीत विधान परिषदेची पुनरावृत्ती होणार








