विप्रोचे सीईओ नीरज खत्री यांची माहिती
नवी दिल्ली :
ग्रामीण भागातील मागणी हळूहळू वाढत असली तरी ती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे विप्रो कंझ्युमर केअरचे म्हणणे आहे. एका मुलाखतीत, विप्रो कंझ्युमर केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि सार्क व्यवसाय) नीरज खत्री म्हणाले, ‘आम्ही ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत काही सुधारणांसंबंधीची चिन्हे पाहिली आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीत परिस्थिती चांगली दिसली आहे.
मागणी हळुहळू वाढत असून ती संथपणे वाढताना दिसते आहे. त्यामुळे सध्याला वेट अँड वॉचची भूमिका अंगीकारावी लागणार आहे. खत्री म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी चांगली राहण्याची कंपनीला अपेक्षा आहे.
विप्रो कंझ्युमर केअरचे देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात वर्चस्व आहे. कंपनी तेथील 80,000 आउटलेटची आघाडीची वितरक आहे. खत्री म्हणाले की विविध राज्यांमध्ये जाळे विस्तारण्याची तयारी कंपनीची आहे.
साबण ब्रँड संतूरची कमाई 2,650 कोटींहून अधिक आहे आणि खत्री म्हणतात की हा साबण श्रेणीतील दुसरा सर्वात मोठा ब्रँड आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये, विप्रो कंझ्युमर केअर आणि लाइटिंगची विक्री 10 हजार कोटींहून अधिक असेल. आर्थिक वर्ष 2022 मध्ये त्याचा महसूल 8,630 कोटी रुपये आहे.









