वृत्तसंस्था / मालेगा (स्पेन)
येथे सुरू असलेल्या बिली जीन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत स्लोव्हाकियाने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
स्लोव्हाकियाच्या श्रीमेकोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या टोमालीजेनोव्हीकवर 6-1, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये मात केली. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात स्लोव्हाकियाच्या हेरुन केकोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या बिरेलचा 7-5, 6-7(4-7), 6-3 असा पराभव केला. आता या स्पर्धेत पोलंड आणि इटली यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. त्याच प्रमाणे इटली आणि ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना बाकी असून तो खेळविला जाणार आहे.









