ऑगस्टमध्ये -0.52 टक्के नोंद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑगस्टमधील घाऊक महागाईमध्ये जुलैच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये -1.36 टक्के असलेला हा दर ऑगस्टमध्ये -0.52 टक्के झाला आहे. मात्र, घाऊक महागाई दर सलग 5 महिने नकारात्मक झोनमध्ये असून अजूनही तो शून्याच्या खालीच असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. अन्नधान्याच्या महागाई दरात घट झाल्यामुळे घाऊक महागाई दरावर परिणाम दिसून येत आहे. अन्नपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर 5.62 टक्क्मयांवर आला आहे. जुलैमध्ये 7.75 टक्के इतका नोंद झाला होता. ऑगस्टमध्ये इंधन आणि वीज महागाई दरात मोठा बदल झाला आहे. जुलैमध्ये त्यांचा घाऊक महागाई दर -12.79 टक्के होता. तर आता ऑगस्टमध्ये हा दर -6.03 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. प्राथमिक वस्तूंच्या घाऊक महागाई दरात बदल होऊन ते काहीसे महाग झाले आहेत. जुलैमध्ये -7.57 टक्क्यांवर असलेला हा दर ऑगस्टमध्ये -6.34 टक्के झाला आहे.









