हार्मोनल बदल यामागील कारण
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये झोपेशी निगडित समस्या अधिक असतात. कॅलिफोर्निया येथील एसआरआय रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये ह्मुमन स्लीप रिसर्च प्रोग्रामच्या संचालिका फिओना बेकर यांच्यानुसार महिलांमध्ये ही समस्या किशोरावस्थेपासून सुरू होत युवावस्थेपर्यंत कायम राहते.

हार्मोनल बदलामुळे महिलांमध्ये एंक्झाइटी अन् काही प्रमाणात नैराश्य निर्माण होत असते. यासोबत पोटाशी निगडित समस्या देखील असतात. या सर्व कारणांमुळे झोप प्रभावित होते. तर गर्भावस्थेदरम्यान देखील शारीरिक समस्या वाढत असल्याने झोपेची नियमितता कमी होत जाते. यानंतर मेनोपॉजदरम्यान देखील सुमारे 7 वर्षांपर्यंत हार्मोनल बदल होतात आणि यामुळे देखील झोप प्रभावित होते.
झोपेच्या समस्येने पीडित महिलांसाठी कॉन्ग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी उपयुक्त आहे. यात मनोवैज्ञानिक व व्यवहारात्मक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नकारात्मक विचारांना कमी करत योग आणि ध्यानाद्वारे झोपेच्या वेळेतील बदल इत्यादी समस्या दूर केली जाते. याचबरोबर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देखील उपयुक्त आहे. यात मेनोपॉजदरम्यान कमी होणाऱ्या हार्मोन्सना सप्लीमेंट्सच्या माध्यमातून पूर्ण केले जाते.









