- आज होणारा दुसरा टी – 20 सामना स्थगित
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय टीम सध्या श्रीलंकेत आहे. त्यातच अष्टपैलू क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडू विलगकरणात गेले आहेत. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेत होणारा आजचा दुसरा टी – 20 सामना एक दिवसासाठी स्थगित करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित आढळल्याने आज होणारी मॅच एक दिवस म्हणजेच 28 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरच बुधवारी दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
दरम्यान, मॅच स्थगित करण्यात आल्याने आता दुसऱ्या मॅचमध्ये पृथ्वी शाॅ आणि सूर्यकुमार यादव यांचा खेळणे कठीण झाले आहे. कारण या दोन्ही खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून सिलेक्ट करण्यात आले होते.
भारतीय टीम श्रीलंकेत 3 टी – 20 खेळणार आहे. यातील पहिला सामना झाला असून भारताने 35 धावांनी जिंकला असून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.









