किमत 38 लाखापुढे : तीन व्हेरियंटमध्ये कार सादर
नवी दिल्ली
स्कोडा या कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी कोडीयाक नुकतीच लाँच केली आहे. तीन प्रकारात ही गाडी बाजारात दाखल झाली असून 38 लाख ते 41 लाख रुपये इतकी किंमत गाडीची असणार असल्याची माहिती आहे. लाँच केल्याच्या घोषणेनंतर 24 तासात 759 कार्स बुक झाल्या आहेत.
कंपनीने 3 व्हेरियंट (प्रकार) मध्ये ही कार आणली असून यातील स्टाईलची किंमत 37.99 लाख रुपये तर स्पोर्टस लाइनची 39.39 लाख रुपये किंमत ठेवण्यात आलीय. कोडीयाक एल अँड केची किंमत 41.39 लाख रुपये असेल.
काय आहेत सुविधा
ही पहिली सुव्ह असून 2.0 लिटर टीएसआय इंजिन या कारला असेल. नव्या मापदंडानुसार गाडीत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. थ्री स्पोक स्टियरिंग व्हिलसह लेदर डिझाइन ब्लॅक सुदिया अंतर्गत रचना गाडीत आहे. इंटिग्रेटेड हेड रेस्टसह बैठक व्यवस्था साइड बोल स्टेरिंगसह आहे. कारमधील बैठक व्यवस्था थंड किंवा गरम करण्याची सोयदेखील यात आहे.









