एका गावात लोक केवळ रात्रीच पडतात बाहेर
उत्तम, सुंदर आणि आरोग्यदायी त्वचेसाठी लोक खूप काही करत असतात. पौष्टिक खाण्यापासून त्वचेसाठी उत्तम थेरपी आणि फेसपॅकचा वापर करतात. परंतु जगातील एका ठिकाणी लोक उन्हात बाहेर पडताच त्यांची त्वचा वितळू लागते. ब्राझीलमधील या गावात लोक अजब आजाराने पीडित आहेत. येथील लोक उन्हात बाहेर पडू शकत नाहीत. हे लोक बाहेर पडण्यासाठी रात्र होण्याची प्रतीक्षा करतात. जर हे लोक दिवसा बाहेर पडले तर स्वत:चा चेहरा गमावून बसतात. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये अरारस नावाच्या गावात हा अजब आजार आहे. येथील लोक उन्हात बाहेर पडले तर त्यांचा चेहरा वितळू लागतो. येथील बहुतांश लोक शेतीच करतात. अशा स्थितीत ते उन्हात काम करणे टाळू शकत नाहीत आणि याचमुळे त्यांची त्वचा वितळू लागते. येथील लोकांचे चेहरे आता विचित्र झाले आहेत. या लोकांना झालेल्या आजाराला एक्सोडेरमा पिगमेंटोसम म्हणजेच एक्सपी म्हटले जाते. या आजाराने पीडित अनेक लोक गावात दिसून येत असतात.
येथील लोकांमध्ये हा आजार आनुवांशिक असल्याचे मानले जाते. तसेच सूर्यकिरणे त्वचेवर पडल्यावर ती वितळू लागल्यास ती पुन्हा निर्माण होत नाही. याचमुळे येथील लोकांचे चेहरे होरपळल्यासारखे दिसून येतात. हे चेहरे पाहून कुणीही घाबरू शकते. हळूहळू हा आजार त्वचेच्या कर्करोगाचे रुप धारण करू शकतो. या आजारावर अधिक संशोधन सुरू आहे.









