Skin Care Tips : उन्हात जास्त फिरलं की चेहरा काळवडंतो. किंवा चेहऱ्याला वांग असेल तरीही चेहरा काळा दिसतो. हे कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी पार्लरचा दरवजा ठोठावावा लागतो. मात्र प्रत्येकवेळी पार्लरला जाणं ज्यांना शक्य नाही. किंवा सतत पार्लरला जावून कंटाळला आला असेल तर घरच्या घरी काही उपाय करून काळवंडलेला चेहरा फ्रेश करता येतो. यासाठी वेगळे काही प्रोडक्ट किंवा खर्च करण्याची आवश्यक्यता नाही. तुम्ही किचनमधील वस्तूंचा वापर करून सुंदर दिसू शकता. कसे चला जाणून घेऊया.
टोमॅटो स्क्रब करा
टोमॅटो स्क्रब करण्यासाठी सुरुवातीला क्लिंझिंग करून घ्या. आता टोमॅटोवर थोडी साखर टाकून चेहऱ्यावर गोलाकार आकारने स्क्रब करा. यात व्हिटामीन ए असते. यामुळे चेहऱ्याचे टॅनिंग काढण्यास मदत होते. संपूर्ण चेहरा आणि मानेला स्क्रब झाल्यानंतर ५ ते १० मिनिट ते चेहऱ्याला तसेच राहू द्या. य़ानंतर थंड पाण्याने चहरा स्वच्छ करून घ्या.
बटाट्याचा रस लावा
टोमॅटे स्क्रब झाल्यानंतर आता चेहरा धुऊन पुसून घ्या. यानंतर टोमॅटोचा पॅक लावा. पॅक तयार करण्यासाठी अर्धा बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढून घ्या. त्यात अर्धा लिंबू पिळा. आता त्यात थोडं गुलाबपाणी घाला. परत त्यात १ चमचा तांदळाच पीठ घाला. याची पेस्ट करून घ्या. यानंतर चेहऱ्याला चोळून लावा. यानंतर चेहरा धुऊन घ्या. आठवड्यातून किमान तीन वेळा हा पॅक लावा.
मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी काय कराल
चेहऱ्या सोबत मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी काॅफी, मध, लिंबाचा रस आणि २ ते ३ थेंब ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेल घाला. हे मिश्रण मानेला चोळून लावा. त्यानंतर ५ मिनिटं तसंच ठेवा नंतर धुऊन घ्या तुम्हाला फरक जाणवेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









