Skin Care In Winter : परतीच्या पावसाने गेली आठवडाभर राज्यात धुमाकूळ घातला आहे. आता बस असं म्हणायची वेळ आली आहे. मात्र आज सकाळी धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली पाहायला मिळाली. यावरूनच आता थंडीची चाहुल लागण्याचा जणू संकेतच मिळाला आहे.कडाक्याची थंडी सुरु झाली की ओठ फुटू लागतात, पायांना भेगा पडतात. स्किन कोरडी पडायला लागते. अशावेळी महागड्या वस्तूंचा भडिमार करण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय करून स्किनची, ओठांची आणि पायांची काळजी घेता येते. यासाठी काय करावं याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तेलाने माॅलिश करा
थंडीत स्किनची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक महागडे प्रोडक्ट असतात. पण कधीकधी याचा फायदा होईलच असे नाही यासाठी थंडीत साध्या खोबरेल तेलाचा वापर करा. यासाठी आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराला रात्री तेल लावा आणि मसाज करा. यानंतर सकाळी कोमट पाण्याने आंघोळ करा. असे केल्यास तुमची स्किन तजेलेदार दिसेल. आणि ओठही फुटणार नाहीत. तुमची स्किन खूप कोरडी असेल तर तुम्ही शरीराचे जे पार्ट ओपण असतात त्याठिकाणी तेलाचा वापर करा. ओठांना शक्यतो नियमित तेल लावा.
पाणी भरपूर प्या
थंडी सुरु झाली की पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते.आणि कडक चहा आणि काॅफीचे प्रमाण वाढते. शरीरात पाणी कमी झाल्य़ाने शरीर कोरडे पडायला सुरुवात होते. यामुळे देखील केस आणि ओठ देखील कोरडे पडतात. यासाठी पिण्य़ाच्या पाण्याचे प्रमाण वाढवा. हे दोन्ही प्रयोग नियमित केल्यास तुम्हाला कोणताच प्रोब्लेम जाणवणार नाहीत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









