उन्हाळ्यात त्वचा पूर्णपणे निस्तेज होते.धुळीबरोबरच प्रदूषण, ऊन आणि अतिनील किरणांचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग आणि काळेपणा दिसू लागतो. अशा परिस्थितीत,अनेकजण टॅनिंग काढण्यासाठी स्क्रबचा वापरत करतात. पण अशावेळी त्वचेवर अँटी टॅन फेस पॅक वापरणे आवश्यक आहे. जेणेकरून त्वचा पूर्वीसारखी टवटवीत आणि फ्रेश दिसेल. यासाठी मसूर डाळचा फेस पॅक हा एक उत्तम पर्याय आहे.घरच्या घरी तुम्ही हा पॅक लावून टँनिंग कमी करू शकता.
मसूर डाळमध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. तर व्हिटॅमिन सी, ई तसेच मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे त्वचेला स्वच्छ करतात आणि त्वचेचा टोन हलका करण्यास मदत करतात. हा पॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधात मसूरची डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे भिजवलेल्या कच्च्या दुधासोबत मिक्स करून बारीक करा. याची पेस्ट तयार झाल्यावर त्यात केशरच्या दोन-तीन काड्या घाला. हा फेस पॅक चेहरा, मान आणि हातावर लावा आणि राहू द्या. साधारण अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने त्वचेच्या टोनमध्ये काही आठवड्यांतच परिणाम दिसून येईल. उन्हाळ्यात दिसणारी निस्तेज आणि टॅन त्वचा ताजी आणि पूर्णपणे चमकदार दिसेल.जर चेहऱ्यावर पिगमेंटेशन असतील तर मसूर डाळ देशी तुपात भाजून घ्या. नंतर कच्च्या दुधात बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० ते २५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने चेहऱ्यावर दिसणारे काळे-तपकिरी डाग कमी होऊ लागतात.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर अवलंबून असून कशाचाही अवलंब करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









