समता फाऊंडेशन आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
मुंबई येथील समता फाऊंडेशन आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या त्वचा व नेत्र तपासणी उपचार शिबिरात ६५ बंदिवानांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली.
या शिबिरात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे जनरल फिजिशियन डॉ निखिल अवधुत, ओरोस शासकीय महाविद्यालयाचे त्वचारोग तज्ञ डॉ शुभम ठेंग, त्वचा रोगतज्ञ डॉ आर वैष्णवी यांनी बंदिवानांची तपासणी केली.यावेळी कारागृहात त्वचा व नेत्र तपासणी उपचार शिबिर आयोजित केल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी समता फाऊंडेशन, ओरोस शासकीय महाविद्यालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांचे आभार मानले.या शिबिरासाठी सावंतवाडी कारागृहाचे हवालदार विजय सुर्वे, सुभेदार सतिश मांडे, कारागृह
हणमंत माने, पोलिस सागर सपाटे, श्री जुन्नेदी, लिपिक प्रताप कदम आदींचे सहकार्य लाभले.









