1.25 कोटी युवांना केले प्रशिक्षित : जी-20 समुहाच्या बैठकीला केले संबोधित
वृत्तसंस्था/ इंदोर
तंत्रज्ञानाचा रोजगाराचा मुख्य घटक ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी प्रगत तंत्रज्ञान आणि प्रक्रियांच्या वापराद्वारे कार्यबळाला कुशल करणे काळाची गरज असल्याचे उद्गार काढले आहेत. जी-20 समुह देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्याच्या इंदोर येथे आयोजित बैठकीला व्हिडिओ संदेशाद्वारे पंतप्रधानांनी संबोधित केले आहे.
निरंतर कौशल्य विकास हाच भविष्यातील कार्यबळाचा मूलमंत्र आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या वर्तमान युगात तंत्रज्ञान रोजगाराचा मुख्य घटक ठरला असून भविष्यातही राहणारआहे. नव्या तंत्रज्ञानांमुळे झालेल्या बदलांदरम्यान भारताला तंत्रज्ञानाशी निगडित रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याचा अनुभव प्राप्त झाला असल्याचे मोदी म्हणाले.
भारतात पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1.25 कोटीहुन अधिक युवांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, इंटरनेट आणि थिंग्स तसेच ड्रोनच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे.
सतर भ्रमण करणारा कार्यबळ भविष्याची वस्तुस्थिती ठरणार आहे. यामुळे विकासाला जगातिक स्वरुप देत कौशल्याचे खऱ्या अर्थाने आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. जी-20 समुहाने याप्रकरणी नेतृत्व करावे असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. जी-20 च्या या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही संबोधित केले आहे. या परिषदेत 20 हून अधिक देशांचे मंत्री सामील आहेत. समूह चर्चेनंतर मसुदा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
पंतप्रधान मोदींनी जी-20 बैठकीत इंदोर शहराची प्रशंसा केली आहे. इंदोर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. इंदोरमध्ये अनेक स्टार्टअप विकसित झाले असून ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या शहराची कामगिरी दर्शविणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









