स्किल इंडिया कार्यक्रमाचा आज ७ वा वर्धापन दिवस देशभरात साजरा होत आहे. या योजनेला राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान असंही म्हटलं जाते.
देशातील युवकांना उद्योगाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणं, हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. २०१५ पासून हे अभियान सुरु झाले असून उपयोग युवकांनी घेतला आहे. या अभियाना अंतर्गत दर वर्षी एक कोटीपेक्षा अधिक युवक प्रशिक्षण घेत आहेत.