बेळगाव ; एसकेई सोसायटी स्पोर्ट्स अकादमी आयोजित व हनुमान स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत प्लॅटिनियम चषक 12 वर्षाखाली अंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने नीना क्रेकेट अकादमीचा 61 धावांनी आनंद क्रिकेट अकादमीने युनियन जिमखानाचा 15 धावांनी, एसकेईने बीएससी ब संघाचा 24 धावांनी तर लायाज क्रिकेट अकादमीने रॉजर क्लबच 5 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. साईराज चव्हाण, आदित्य जाधव, लक्ष खतायत, हैदरअली सय्यद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. आरपीडी मैदानावर खेळविलेल्या पहिल्या सामन्यात एसकेईने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडीबाद 125 धावा केल्या. त्यात आदित्य जाधवने 6 चौकारांसह 64, आर्या बांदिवडेकरने 13 धावा केल्या. बीएससी ब तर्फे ओम आजरेकरने 23 धावात 2, अनिश बी व मथंन शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससी ब संघाचा डाव 24 षटकात सर्व गडी बाद 101 धावात आटोपला. त्यात मयूर जाधवने 2 चौकारांसह 27, मंथन माईनकरने 3 चौकारांसह 14 तर यशोनंदन बागीने 12 धावा केल्या. एसकेईतपर्फे आदित्य जाधवने 2 तर वैभव, नितीन व समर्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 7 गडी बाद 104 धावा केल्या. त्यात अवनीश हट्टीकरने 3 चौकारांसह 44, ऋतिक के ने 19, ऋतुराज जाधवने 13 धावा केल्या. लायाजतर्फे साईराज जाधवने 21 धावात 3, स्वयं खोतने 1 धावात 2, आरव शेट्टीने 16 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लायाज क्रिकेट अकादमीने 19. 2 षटकात 5 गडीबाद 105 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला त्यात वेदांत बिजल व साईराज चव्हाण यांनी 3 चौकारांसह प्रत्येकी 23 धावा केल्या. स्वयं खोतने 15, सिद्धार्थ अधिकारीने 13 धावांचे योगदान दिले. रॉजरतर्फे जतीन दुर्गाईने 22 धावात 2, मंथन व स्वयं यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. एसकेई प्लॅटिनम मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स अ ने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडीबाद 137 धावा केल्या. त्यात लक्ष खतायतने 2 चौकारांसह 47, प्रज्योत उघाडेने 2 चौकारांसह 21, केदार शंभुचेने 18, आरुश पुत्रनणे 14 धावा केल्या. निनातर्फे सर्वज्ञ पाटीलने 19 धावात 2, तर समर्थ, श्रवण व जियान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना निना क्रिकेट अकादमीचा डाव 21. 2 षटकात सर्व गडी बाद 76 धावात आटोपला. त्यात श्रवण भोकरेने 25 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सिद्धार्थ रायकरने 14 धावात 2, केदार, सुजल, वेदांत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 95 धावा केल्या. त्यात हैदरअली सय्यदन 1 चौकार 1 षटकारासह 36 धावा केल्या. ऋतुराज गोलहळ्ळीने 13 तर पृथ्वी नाईकने 11 धावा केल्या. जिमखानातर्फे अतिथी भोगनने 13 धावात 3, मोहित अब्बासने 13 धावात 2, मीर मिरजीने 14 धावात 2, तर अनिस तेंडूलकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 7 गडी बाद 80 धावा केल्या. त्यात मिरमिर्जीने 13, मोहित अब्बासने 11 धावा केल्या. आनंदतर्फे स्वराज्य जुवेकरने 13 धावात 2, आरुश देसूरकरने 16 धावात 2, आयन मुल्ला व आर्थव मरूचे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.









