बेळगाव : सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब आयोजीत साईराज लॉन पुरस्कृत नरेद्र कुलकर्णा स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांत एसकेई क्रिकेट अकादमीने समर्थ सीसी संघाचा 106 धावांनी, एसकेई अ ने एक्स्ट्रिम सीसीचा 4 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. पार्थ केसुलकर, पार्थ नयन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. एसकेई प्लॅटियम ज्युबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या अच्या पहिल्या सामन्यात एसकेई क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 164 धावा केल्या. त्यात तेजसने 4 षटकार व 4 चौकारांसह 58, अशोक सिंगने 6 चौकारांसह 29 धावा केल्या.
समर्थ सीसी तर्फे कनाल हणगोजीने 3 तर कृष्णा रेड्डीने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना समथं सीसी संघाचा डाव 14.2 षटकात 58 धावांत आटोपला.दुसऱ्या सामन्यात एक्सट्रिम सीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व गडीबाद 134 धावा केल्या. त्यात चेतन देसाईने 23 तर जयंत यादवने 22 धावा केल्या. एसकेई तर्फे पंकज कुणाल व पाथं केसुलकर यांनी प्रत्येकी 3, गौरव टी. व अशोक एस. यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेईने 19 षटकात 6 गडीबाद 135 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात श्रवण मेणसेने नाबाद 44, अशोक एस.ने 4 चौकारांसह 35 धावा केल्या. एक्सट्रीम सीसी तर्फे राहुल वेर्णेकरने 2 गडी बाद केले.









