प्रतिनिधी / बेळगाव
क्रिएटिव्ह सोल्सतर्फे दि. 12 व 13 रोजी युके27 : द फर्न हॉटेल येथे ‘सिक्स यार्ड्स ऑफ एलिगन्स’ हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात साड्या, रेडिमेड ब्लाऊज, दुपट्टा, साडी, बेल्ट्स यांचा समावेश आहे. अनुपमा जोशी यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
प्रामुख्याने भोपाळ येथील सान्वी एथनिक्सतर्फे माहेश्वरी, चंदेरी, गज्जी सिल्क, कॉटन, साख्या साडी, गडहिंग्लजतर्फे चंदेरी कॉटन सिल्क, माहेश्वरी कॉटन सिल्क, मुलकॉटन, प्युअर कॉटन, लिनन, बेंगळूरच्या साई कलेक्शन्सतर्फे हातांनी विणलेल्या सिल्क आणि बनारसी साड्या, काश्मीरच्या बेगआर्ट्सतर्फे काश्मिरी व आरीवर्कच्या साड्या, पुण्याच्या सौदामिनी हॅन्डलुमतर्फे प्युअर हॅन्डलुम पैठणी, क्लासिक बनारसी, एलिगंट कॉटन्स, प्युअर सिल्क व कॉटन रेडिमेड ब्लाऊज यांचा समावेश आहे.
नागपूरच्या मेघना क्रिएशन्सतर्फे हॅन्ड पेंटेड व हॅन्ड एब्रॉयडरी, हॅन्डलुम साडी, शाकुंतल डिझाईन्स स्टुडिओ पुणेतर्फे कलमकारी, कला कॉटन, भुजोडी, आसाममधून डोंगरीया, लिनन, खादी, तसर, ऑर्गेनिक कॉटन, आँग्रेजा ब्लाऊज, सोंदूरच्या सुजीधारा मने येथील मळकालमुर व इरकलवर लंबाणी वर्कच्या साड्या व ब्लाऊज, गॅलेक्सी कलेक्शन बेळगावतर्फे कांजीवरम, बनारसी, लेनीन, कॉटन, ऑरगंजा, काश्मीर व चिकनकारी, एथनिक लेबलतर्फे हॅन्डलुम, लिनन, लिनन टिशु, टसर, मुंगासिल्क साड्या व ब्लाऊज, स्टुडिओ अद्वैका बेळगावतर्फे माहेश्वरी कॉटन, सिल्क, इरकल, हॅन्डब्लॉक प्रिंट, चंदेरी, गदग व खादी कॉटन, बेळगावच्या क्विन्स कलेक्शनतर्फे रेडिमेड ब्लाऊज, कॉटन, जरदोसी वर्कचे कपडे, बनारसी, जॉर्जेट, सिफॉन सिल्क साड्या, बेळगावच्या कसुती कवनातर्फे कसुती साड्या, ब्लाऊज व दुपट्टा, फ्रेडवर्क स्टोरी बेळगावतर्फे सिल्क, हॅन्डलुम व हॅन्डक्राफ्टच्या साड्या, ब्लाऊज व दुपट्टे, बेळगावच्याच मेस्मरायझिंग सिल्व्हरतर्फे प्युअर सिल्व्हर ज्वेलरी यांचे स्टॉल प्रदर्शनात असणार आहेत.
यंदाचे हे चौथे वर्ष असून हजार रुपयांपासून 50 हजार रुपये किमतीच्या कलात्मक साड्या असतील. येणाऱ्या श्रावणापासून सुरू होणाऱ्या सणांची रंगत वाढविण्यासाठी तसेच विणकर व स्त्राr उद्योजिकांना प्रोत्साहित करण्यासाठी महिला व पुरुषांनी अवश्य भेट द्यावी, असे हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत 12 व 13 ऑगस्ट रोजी मोफत खुले आहे.









