वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2024 च्या महिलांच्या बिगबॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या सहा महिला क्रिकेटपटूंची निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा ऑस्ट्रेलियात 27 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत.
या स्पर्धेसाठी अॅडलेड स्ट्रायकर्सने स्मृती मानधनाशी, मेलबोर्न स्टार्सने यष्टीरक्षक आणि फलंदाज यास्तिका भाटीयाशी आणि दिप्ती शर्माशी, ब्रिसबेन हिटने शिखा पांडेशी तसेच जेमिमा रॉड्रीग्जशी, पर्थ स्कोरचर्सने डी. हेमलताबरोबर करार केला आहे.









