सेल्फ-लोडिंग रायफल्ससह अनेक शस्त्रs जप्त
वृत्तसंस्था/ इंफाळ
सुरक्षा दलांनी मणिपूरच्या वेगवेगळ्या भागातून बंदी घातलेल्या संघटनांच्या चार दहशतवाद्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी इंफाळमधील मोंगजामच्या पायथ्याशी शोध मोहिमेदरम्यान सुरू केलेल्या या कारवाईत सुरक्षा दलांनी एक कार्बाइन, एक सेल्फ-लोडिंग रायफल, सात मॅगझिन, 73 काडतुसे आणि 37 रिकामे गोळे जप्त केले. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये टोंगब्राम डॉली देवी (कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी), लोंगजाम टोनी सिंग (केसीपी पीडब्ल्यूजी), लैशराम नोंगदंबा सिंग उर्फ लानलिबा (सोरेपा), आरके खोमदोन्साना (अराम्बाई टेंगगोल), लोरेम्बाम थोइबा उर्फ जॅक्सन (अराम्बाई टेंगगोल) आणि प्रेपॅकचा एक कॅडर आदींचा समावेश आहे.









