कासेगाव प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील काळमवाडी फाट्यावरील देवराज हॉटेल मधील आचाऱ्याला बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून सहा जणांनी ३० हजार रुपयांची खंडणी उकळली. ठरलेल्या उर्वरित रकमेसाठी शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणात दलित महासंघाचे नेते व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
विकास बल्लाळ, अजिंक्य बल्लाळ (रा. नेर्ले) बाळासो पाटसुते रा. प्रविण बडेकर (रा. कासेगाव)शंकर महापुरे( रा. इस्लामपुर, )ऋतुराज धुमाळ (रा. कापुसखेड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. विनायक मारुती गायकवाड (३६,मूळ रा. कसणी, ता. पाटण ) असे फिर्यादीचे नाव आहे. गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपींनी आठ ते नऊ महीन्यापूर्वी बलात्कार, विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविणेची धमकी देवून दोन लाख रुपयांची मागणी केली. चर्चेअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी तीस हजार रुपये खंडणी त्यांनी वसुल केली. त्यांनतर त्यांनी उर्वरीत रक्कमेची वारंवार मागणी करुन शिवीगाळी, दमदाटी केली.याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.








