वृत्तसंस्था/ कोची
केरळमध्ये निपाह विषाणूचा संशय असलेल्या 6 जणांच्या चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यातील काही रुग्णांची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी राज्यात निपाह संसर्गाचा कोणताही धोका नसल्याची पुष्टी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. निपाह संशयित रुग्णांवर मंजेरी मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले. या तपासणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व 49 जणांवर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मलप्पुरम जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.









