गोवा पोलिसांची त्वरित कारवाई, सर्व संशयित आरोपींना अटक : विरोधकांचा सरकार कायदा, सुव्यवस्थेवऊन हल्लाबोल
पणजी : गेल्या आठवड्याभरात गोव्यात दिवसाला किमान एका खुनाची घटना घडली आहे. मालमत्ता, अनैतिक नातेसंबंधातील वाद आणि चारित्र्याच्या संशयावऊन हे खून झाले आहेत. ज्यांचे खून झाले ते व खूनी सर्वच परप्रांतीय आहेत. केवळ खूनाच्या घटना गोव्यात घडल्याने गोवा राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध प्रसारमाध्यमातून गोवा बदनाम होत आहे. याच्यावर वेळीच आवर घालणे गरजेचे असून अन्यथा याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यात पर्वरी, ओल्ड गोवा व डिचोली तर दक्षिण गोव्यात ऊमडामळ माडेल-फातोर्डा आणि मायणा कुडतरी पोलीस स्थानक हद्दीत खुनाच्या घटना घडल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, पोलीस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंह यांनी सांगितले की, गोवा पोलिसांनी त्वरित हालचाल केली आणि आरोपींना अटक केली. ताळगाव येथील रहिवासी चंद्ररखा ऊर्फ गब्बर रामनवमी याची उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या मालमत्तेच्या वादातून हत्या करण्यात आली होती. ओल्ड गोवा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत झारखंडचा रहिवासी असलेल्या मुन्ना भुईया (46) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली. त्यांने पत्नी संजू देवी भुईया (46) हिला बाणस्तारी येथील एका शेडमध्ये ठार मारले होते. त्याच दिवशी डिचोली पोलिसांनी संगिता सिद्दगोली (29) आणि रामू गवळी (50) यांना रमेश सिद्दगोली (39) याच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. अवैध संबंधातून पती पत्नी यांच्यात वाद झालानंतर रामू गवळी याच्या साहाय्याने पत्नीने पती रमेश सिद्दगोली याचा काटा काढला होता.
बुधवारी 30 ऑगस्ट रोजी एका बांधकामाजवळ एका व्यक्तीची हत्या झाल्याचे आढळून आले. फातोर्डा पोलिसांनी अज्ञाताविऊद्ध खुनाचा गुन्हा दाखल कऊन तपास कामाला सुऊवात केली. सीसीटिव्हीच्या माध्यमातून संशयित संशयित वीरेश यल्लप्पा (28) याला बागल कोट येथे जाऊन अटक केली व गोव्यात आणले. शुक्रवारी आणखी दोन हत्यांच्या वृत्ताने गोवा हादरला. कामाक्षी शंकर उ•नोव (30) हिची पर्वरी येथे तिच्याच राहत्या फ्लॅटमध्ये प्रियकराने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश चुचंवडा (22) आणि त्याचा मित्र निऊपदी श्ररणप्पा कडाकल (21, दोघेही सुकूर येथील रहिवासी) यांना अटक केली आहे. याच दिवशी सकाळी सादिक बेल्लारी (22) याचा तो झोपेत असतानाच खून करण्यात आला. सादिक याला एका खूनाच्या प्रकरणात अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. सादिक खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे असे सांगताना या हत्याकांडावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करीत आहेत. भाजप सरकारच्या कुशासनामुळे गोवा हे आता खून करण्याचे ठिकाण बनले आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. गोव्यात दररोज खुनाच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असेही युरी आलेमाव म्हणाले.









