ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे गटातील 6 आमदार लवकरच आमच्यासोबत येणार आहेत, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत केला.
सामंत अमरावतीत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसेच पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढविण्यावर भाजप आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ते म्हणाले, शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र ठरवायचे की अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतली. त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही.
मनीषा कायंदे, नीलम गोऱहे या शिंदे गटात आल्याने ठाकरे गट बिथरला आहे. शिंदे गटाच्या सरकारमधील नाराजीबद्दल अफवा उठविण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही. उलट ठाकरे गटात नाराजी असून, त्यांचे आणखी 6 आमदार आमच्यासोबत येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.