कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
मुंबई – बेंगलोर तसेच नागपूर – रत्नागिरी या महामार्गावर सद्या सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, विकासाच्या दृष्टीने हे काम महत्वाचे आहेच. मात्र गेल्या दिड वर्षात महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून 113 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विकासाच्या नावाखाली महामार्गावर अजून किती बळी जाणार आहेत हे आता पहावे लागेल. विकासक कंपनीने याबाबत योग्य ती खबरदारी घेवून ब्लॅकस्पॉटच्या पूर्वीच 100 मीटरवर सुचनांचे फलक लावणे आवश्यक आहे.
कोल्हापूर जिल्हा हा दरडोई उत्पन्नामध्ये राज्यात अग्रेसर आहे. कर्नाटक, गोवा, मुंबई पुणे यांना जोडणारा महामार्ग कोल्हापूर पासूनच जातो. तसेच गोकुळ शिरगांव, शिरोली एमआयडीसी, आणि पंचतारांकीत एमआयडीसी या तिन एमआयडीसी असल्यामुळे या महामार्गावर मालवाहतूकीचे आणि प्रवासी वाहतूकीचे प्रमाण अधिक आहे. मुंबई – बेंगलोर महामार्गावर सध्या सहा पदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काम सुरु झाल्यापासून गेल्या दिड वर्षात 52 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि विकासक कंपनी यांनी योग्य त्या खबरदारी न घेतल्यामुळे अपघातामध्ये भर पडत आहे. महामार्ग प्राधीकरणाने कंपनीला योग्य त्या सुचना देण्याची गरज आहे. तसेच कंपनीने त्या त्या उपाययोजना करणे गरजेच आहे.
- 2023 सालामधील अपघात
एकूण अपघात : 343
मयत : 137
जखमी : 406
- 2024
एकूण अपघात : 416
मयत : 184
जखमी : 380
- एप्रिल 2025
एकूण अपघात : 113
मयत : 32
जखमी : 117
- तीन वर्षात महामार्गानुसार मृत संख्या
मुंबई – बेंगलोर महामार्ग : 106 मयत
नागपुर – रत्नागिरी महामार्ग : 80 मयत
बेळगांव – वेंगुर्ला महामार्ग : 25 मयत
हुपरी – निढोरी फाटा महामार्ग : 23 मयत
कोल्हापूर – गारगोटी महामार्ग : 19 मयत
गडहिंग्लज – चंदगड महामार्ग : 17 मयत
आंबोली – आजरा : 11 मयत
हुपरी – गगनबावडा महामार्ग : 9 मयत
- उपाययोजना
– डायव्हरजनच्या ठिकाणी आणी पूर्वी बोर्ड लावणे
– काम सुरु असलेल्या ठिकाणी तात्पुरते रिलींग करणे.
– महामार्गावर वेगमर्यादेचे फलक लावणे
– पावसाळ्यात काम सुरु असलेल्या ठिकाणी निसरट होत असेल तर पाणी मारण्याची व्यवस्था करणे
- काम सुरु अपघात जास्त
मुंबई – कोल्हापूर या मार्गाचे गेल्या दिड वर्षापासून काम सुरु आहे. 164 अपघात झाले आहेत. यामध्ये 66 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर नागपुर रत्नागिरी मार्गावर 47 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्यांकडून निविदेमधील अटी व शर्थींचे योग्य प्रकारे पालन न करणे, तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच हे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
कोल्हापूर – बेंगलोर महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. दोनही बाजूच्या तिसऱ्या लेनचे काम सुरु असल्यामुळे महामार्गावर काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. यातच पावसामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी कामामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. वाहनधारकांनी वाहने महमार्गावर दिलेल्या वेगमर्यादेमध्ये चालवण्याची दक्षता घ्यावी.
सत्यराज घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस मदत केंद्र, उजळाईवाडी








