पुणे / वार्ताहर :
नामांकित बँकेत मुलाला क्लार्क पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी रोहन सुनील बुळे (वय 25) आणि अविनाश रूकारी (रा. कोल्हापूर) या दोघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश रमेश भालेराव (52, रा. महर्षीनगर, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. संबंधित प्रकार सन 2017 ते 2023 यादरम्यान घडलेला आहे.
रोहन बुळे आणि अविनाश रूकारी यांनी संगनमत करून तक्रारदार अविनाश भालेराव यांच्या मुलास बँकेत क्लार्क पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्यानुसार त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी एकूण सहा लाख रुपये घेऊन त्यांच्या मुलास नोकरीस न लावता तसेच दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. कारके पुढील तपास करत आहेत.









