प्रतिनिधी/ बेळगाव
अंबडगट्टी येथे आपल्या शेतजमिनीत गांजाचे पीक घेणाऱया एका युवकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 6 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी शनिवारी रात्री पत्रकारांना ही माहिती दिली आहे. शिवानंद शिवन्याप्पा काद्रोळी (वय 40, रा. अंबडगट्टी) असे त्याचे नाव आहे. सुमारे 60 हजार रुपये किमतीचा 6 किलो गांजा व 1 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कित्तूरचे पोलीस उपनिरीक्षक एच. एल. धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. शिवानंदवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.









