प्रतिनिधी, सरवडे
फराळे (ता.राधानगरी) येथील बाबूराव बाळू पाटील यांच्या गोठा घराला मध्यरात्री रात्री शाँर्टसर्किटने आग लागली. यामध्ये मुर्हा जातीच्या सहा म्हैशी अक्षरशः होरपळून मृत्युमुखी पडल्या. तर एक म्हैस भाजल्याने गंभीर जखमी झाली आहे. तसेच आग विझवताना बाबुराव पाटील हे देखील जखमी झाले आहेत.आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, फराळे येथील शेतकरी बाबुराव पाटील यांचा घरालगतच जनावरांचा मोठा गोठा आहे.ते बुधवारी रात्री दहा साडे दहाच्या सुमारास जनावरांना वैरण घालून दरवाजा बंद करून झोपण्यासाठी घरी गेले होते.त्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान पाटील यांच्या गोठ्याला आग लागल्याचे शेजारील काही महिलांच्या निदर्शनास आले. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बाबुराव पाटील गोठ्याजवळ पोहचले. ताबडतोब पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.परंतु गोठ्यातील माळ्यावर वैरण असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे गोठा घर अक्षरशः जळून खाक झाले. गोठ्यात असलेल्या सहा मुर्हा म्हैशींचा आगीत होरपळून जागीच मृत्यु झाला.त र एका म्हैशीला वाचवण्यात यश आले. मात्र ती म्हैस देखील गंभीर भाजली आहे. गोठा,वैरण व म्हैशी जळाल्याने पाटील यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी गोकुळचे संचालक अरुण डोंगळे,अभिजीत तायशेटे, किसन चौगले,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील,राजेंद्र मोरे, नंदकिशोर सूर्यवंशी, भिकाजी एकल, अरुण जाधव, गटविकास अधिकारी संदिप भंडारे, ग्रामसेवक, तलाठी यांनी भेट दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








