नवी दिल्ली
चारचाकी वाहनांकरिता सहा एअरबॅग असण्याची सक्ती यापुढे नसणार असल्याच्या संबंधीचा खुलासा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केला आहे. सरकार कारकरिता सहा एअरबॅगची सक्ती संबंधीचा नियम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या वर्षी सहा एअरबॅग सक्ती संबंधीची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2023 पासून होणार होती. काही ऑटो कंपन्यांनी याला विरोध दर्शवला होता. अखेर मंत्र्यांनी कारमध्ये सहा एअरबॅग संबंधी सक्ती करणार नसल्याचे स्पष्टीकरण देत दिलासा दिला आहे.









