Kolhapur Shivsena News : ठाकरे गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यावर सेटलमेंट करून आंदोलन करतात असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत उध्दव ठाकरेंची दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सेना भवन येथे भेट घेऊन विजय देवणे यांच्या बाबत तक्रार दिल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत देवणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. समाज माध्यमावर व्हायरल झालेले पत्रक हे तीन महिन्यापूर्वीचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्या बाबतीत झालेला हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. समाज माध्यमावर व्हायरल झालेले पत्रक हे तीन महिन्यापूर्वीचे आहेत. माझ्या बाबत तक्रार गेली होती मात्र त्यावेळी बैठक घेऊन यावर तोडगा निघाला होता. मात्र आता पत्रक व्हायरल होण्यामागे माझ्या बदनामीच राजकारण सुरू आहे. वरिष्ठांनी याची चौकशी सुरू केल्यास त्या चौकशीला सामोरे जाईन. असे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिले आहे.









