कोल्हापूर :
बोगस औषध खरेदी व पुरवठा प्रकरणी विशाल एंटरप्रायज कंपनीच्या चौकशीसाठी एसआयटीच्यामार्फत तपास सुरू आहे. तशा सुचनाही दिल्या आहेत. औषध घोटाळ्यातील दोषींवर कठोर शासन करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
शनिवारी सीपीआर व शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. औषध घोटाळ्यासंदर्भात ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या न्यूटन कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोषींना अटक झाली असुन हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. शासनाकडून याचा खोलवर जाऊन तपास सुरू असुन दोषींची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, औषध पुरवठा व खरेर्दीं शासन करत नाही. हापकीन संस्था निर्माण केली होती. हापकीनकडून झाले नाही म्हणून प्राधिकरण तयार केले. आहे. यावर जिल्हा नियोजन मंडळाच्याअतंर्गत जिल्हाधिकारऱ्यांची कमिटी आहे. आत खरेदीचे अधिकारी अधिष्ठातांना दिले आहेत. दरपत्रक घोटाळा संदर्भात चौकशी सुरू आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने अहवाल दिला आहे. दोषी आढळणाऱ्या कोणालाही अभय दिले जाणार नाही. निवडणुका लागल्यामुळे कारवाई करण्यास विलंब झाला होता. आता सरकार आपले आहे. यापुढे आता गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून तपासाला गती देणार असल्याचे सांगितले.
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता मुश्रीफ म्हणाले, धस यांनी आरोप केले त्यावेळी मी विधानसभेत हजर होतो. काल धनंजय मुंडे यांनी उत्तर देत जो आरोपी असेल त्याला फाशी द्या, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. भाजप कुणाला टार्गेट करते असे काही नाही. राज्याला आता देवेंद्र फडणवीस कार्यक्षम मुख्यमंत्री लाभलेलें आहेत. ते तत्काळ याचा शोध घेवून पडदा फाश करतील. जोपर्यंत दोषी आढळत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेबद्दल लवकरात लवकर पावले उचलतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
सीपीआरमधील अतिक्रमण आठ दिवसात काढा
सीपीआरमधील अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. तरीही अतिक्रमण काढले जात नाही. बेशिस्त पार्कींगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमणावर कारवाई करा, अशा सुचना मंत्री मुश्रीफ यांनी सीपीआरच्या अधिष्ठातांना दिल्या.
आता शासकीय डेंटल कॉलेज उभारणार
आपल्याकडे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय झाले आहे. कॅन्सर, बीएचएमएस, बीएएमए शासकीय कॉलेज झाले आहे. आता डेंटल विभागीय कॉलेज उभारणार आहे. यासाठी प्रयत्न करून लवकरच याचे काम करू याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.








