राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात बनावट गुणपत्रिका वापरून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणाऱ्या रॅकेटची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच या प्रकरणाचा योग्य तपास न केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस उपअधीक्षक आणि एका तपास अधिकाऱ्याची गैर- प्रशासकीय पदावर बदली करण्याची घोषणा विधानसभेत केली.
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून सातारा येथील रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर हॉस्पिटल मॅनेजमेंट कोट्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी बनावट मार्कशीट आणि स्थलांतर प्रमाणपत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “साताऱ्यात घडलेले हे प्रकरण एका मोठ्या भ्रष्टाचार आहे. परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट मार्कशीट देऊन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत होती. महादेव देशमुख, चंद्रकांत देशमुख आणि त्रिदीप गुहा यांच्याकडून हे रॅकेट चालवले जात होते” असे उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला.
तसेच या प्रकरणाचा साक्षिदार निलेश माने पोलिसांसमोर येऊनही पोलिसांनी या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास केला नसल्याची माहिती त्यांनी विधानसभेत देताना “आम्ही पुढील एका महिन्यात या प्रकरणाचा एसआयटीमार्फत पुन्हा तपास करू. आणि Dy SP आणि तपास अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकू.” असे म्हणाले.








