ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील मिठी नदी गाळ प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली.
आ. प्रसाद लाड यांनी विधानसभेत मिठी नदी आणि ओढय़ातील गाळ काढण्याच्या मुद्यावर लक्ष्यवेधी मांडली. मिठी नदी आणि ओढय़ातील गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत 2005 पासून 2023 पर्यंत नदीच्या सौंदर्यासाठी तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला, याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. याला उदय सामंत यांनी उत्तर दिले.
सामंत म्हणाले, मिठी नदीच्या रुंदीकरण व सौदर्यीकरणावर 1160 कोटी खर्च झाले. संबंधित काम मुंबई महानगर पालिका आणि एमएमआरडीए यांच्याकडे होतं. या कामात कंत्राटदार कोण होते, किती पैसे कुठे खर्च करण्यात आले. याबाबत एसआयटी चौकशी करण्यात येईल.








