नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे माजीं उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. आता ही कोठडी 17 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. सिसोदिया यांच्यावर दिल्लीच्या मद्यधोरणात बदल करुन मद्य व्यापाऱयांना गैरलाभ मिळवून दिल्याचा आणि या मोबदल्यात पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीने केली होती. 9 मार्चला या प्रकरणात ईडीने सिसोदियांनी अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयनेही त्यांच्या विरोधात गुन्हा सादर केला असून त्यांना या प्रकरणातही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.









