कर्तव्यपूर्तीच्या दृष्टीने समाजात परिपूर्ण नागरिक घडावेत, यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनाला निश्चित दिशा देण्यासाठी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती. हरमलचे माजी सरपंच स्वःथा जमीनदार स्व. गणपत पार्सेकर (सरांचे काका) यांनी दृरदृष्टी बाळगून लावलेले रोपटे आज वटवृक्षांत रूपांतर झाले हे म्हणताना शैक्षणिक क्षेत्रात ब्रँडस ऑफ गोवा स्वःस्थान निर्माण केले हा सोनेरी कर्तृत्त्वाचा ठसा होय. हे निर्मिण्यात अथक योगदान व परिश्रमपूर्वक प्रयत्नांची पराकाष्टा केलेले सर पर्सेकर होय. सरांच्या वाढदिनानिमित्त.
साधारणतः 1967 साली शिक्षणाची सोय हरमल वगळता नजीकच्या गावात नहोती. सरांनी कोरगाव, म्हापसा व नंतर महाविद्यालयीन शिक्षण पणजीत पूर्ण केले. पदवीत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरमल पंचक्रोशीत असि. टिचर म्हणून रूजू झाले. खरे म्हणजे सरांच्या शिकवणीमूळे विज्ञान, गणित विषयांच्या निकालात कमालीची प्रगती झाली. परिणामी, शाळेच्या पंचक्रोशीने निकालासाठी शिकस्त केली मात्र, ध्येयप्रेरित व शिक्षण म्हणजे आयुष्याची सर्वागीण विकासात महत्त्वाचा रोल मानत असलेले सर पार्सेकर यांनी कार्य सुरू केले. ज्ञानपीठ संकुलाच्या निर्मितीत शिक्षक, अध्यापक, प्राचार्य संस्थेचे सचिव व चेअरमनपद असे विविध टप्प्यांवर अनुभवसमृद्धीने सर पार्सेकर यांनी संस्थेला सर्वोच्च शिखरावर विराजित केले.
सरांचे काका स्व. गणपत पार्सेकर यांनी तीन खोल्यांच्या इमारतीतून पवित्र ज्ञानदानाचे कार्य सुरू केले होते. प्रारंभी 26 विद्यार्थी संख्या होती. आजमितीला दोन हजार विद्यार्थी संख्या व 170 पेक्षा उच्च विद्याविभूषीत अध्यापकवर्ग ज्ञानदानाचे कार्य उत्तमपणे निभावत आहे. तीन खोल्यांची शाळा इमारत नंतर तीन मजली इमारत व भोम येथील विद्या संकुल या प्रशस्त भूमीत तीन मजली तीन स्वतंत्र्य इमारतींच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य चालू आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसायिक विभाग व कॉलेज या व्यतिरिक्त बँकींग, इन्शुरन्स, आयपीएस, आयएएस सारख्या स्पर्धात्मक परिक्षांच्या तयारीसाठी पार्सेकर कॉलेज ऑफ एक्सलन्स विभाग सुरू आहे. आगामी काळात केजी ते पीजी पर्यंतची शिक्षण संस्था हरमल गावात उभारण्याची कल्पक दृष्टी सर पार्सेकर यांनी न बाळगली तर नवलच.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची सोय व ज्ञान संपादनाची भूक हेरून नवनवीन विभाग सुरू करण्याचा संकल्प बाळगून आहे. संस्थेपाशी 22 हजार चौरस मीटर जागा असून तीन प्रशस्त व सुसज्ज इमारती उभारनाना क्रिडांगण, इनडोअर गेम्स सुविधा, वातानुकलित सभागृह, तसेच अटल रिकरिंग लॅबच्या सहाय्याने वैज्ञानिक शास्त्रज्ञ संशोधनाची आवड निर्माण व्हावी हा हेतू. बारावी वा अध्यावर शिक्षण सोडून देणाऱया विद्यार्थ्यात अभिरूची वाढावी या हेतूने रेडक्रॉस, एनएसएस, नौदल विभागाचा विषय, सेक्रेटरीयल प्रॅक्टीस आदी विषयांचे अभ्यास क्रमांचा समावेश केला आहे. आजमितीस या संस्थेतून डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, प्राध्यापक, शेफ्स, सीए, शासकीय उच्चपदस्थ अधिकारी, तसेच उद्योग व्यवसायिक होऊन शिक्षण संस्थेच्या यशाचा अश्वमेघ फडकत ठेवला आहे. आगामी काळात संस्थेच्या मालकिच्या जागेत तंत्रज्ञान विषयक इन्स्टिटय़ूट आकारास येवो हीच मनोकामना संस्थेच्या स्वाभिमानी सदस्यात रूजली असून, चेअरमन सर पार्सेकर त्या दृष्टीने कार्यप्रवण होतील हा विश्वास आहे.
सरांच्या वाटचालीत, संस्थेचे कार्यकारी पदाधिकारी, सदस्य तसेच तिन्ही विभागाचे हेडस बरोबरीने संगत देत आहेत. हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तथा सरांच्या अर्धागिनी स्मीता पार्सेकर, पुत्र ऋषीकेश व हायर सेकंडरीच्या अध्यापिका सौ. शांभवी नाईक (पार्सेकर) यांचे भरीव योगदान सरांना (हायस्कूल-शिक्षक) तितकेच उर्जास्थानी असते. सरांना उदंड आयुष्य आरोग्य व ध्येयप्राप्तीचे बळ प्राप्त होवो ही आजच्यादिनी शुभेच्छा.
अरूण बांधकर हरमल









